जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । अमळनेर येथील श्री. मंगळदेव ग्रह मंदिरात श्री.स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिना निमित्ताने लघुरुद्र महापूजा झाली. मंदिरात स्वामींची अद्वितीय प्रतिमा स्थापित असलेल्या स्थळी विशेष सजावट करून उत्सव साजरा करण्यात आला.
महापूजेचे मानकरी डॉ.अमोल नारायण पाटील होते. मुख्य पुरोहित केशव पुराणिक होते. त्यांना सुनील मांडे, निलेश असोदेकर, सारंग पाठक, व्यंकटेश कडवे, साहिल जोशी, प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, मेहुल कुलकर्णी, यतीन जोशी यांनी सहकार्य केले. या लघुरुद्र महापूजेनंतर विशेष महाआरती झाली. दरम्यान स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त मंदिरातर्फे गोर गरीबांना मिठाई वाटप करण्यात आली. या महापूजेला मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिव एस.बी.बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिराव, जयश्री साबे ,सेवेकरी विनोद कदम, मनीष जोशी, प्रशांत सिंघवी, खिलू ढाके सह सेवेकरी मंडळी उपस्थित होते.