महापौरांच्या हस्ते प्रभाग ३ मध्ये रस्त्यांच्या कामाला सुरुवात

एप्रिल 1, 2022 12:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून शुक्रवारी प्रभाग ३ मध्ये देखील दोन मुख्य रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते शुक्रवारी मोहन टॉकीज ते खेडी आणि दशरथ नगरातील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.

jalgaon raste udghatan

जळगाव शहरातील बहुतांश मुख्य रस्ते पावसाळ्यापूर्वी तयार करण्यात येणार असून मनपा प्रशासन कामाला लागले आहे. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे २ कोटी रुपयांच्या जुना असोदा रोड मोहन टॉकीज ते जुना खेडी रस्त्यापर्यंत आणि का.ऊ.कोल्हे शाळेच्या मागील बाजूला असलेल्या दशरथ नगरातील ७ लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाला शुक्रवारी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून सुरुवात करण्यात आली.

प्रसंगी आ.सुरेश भोळे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका रंजना सपकाळे, कांचन सोनवणे, रंजना वानखेडे, प्रवीण कोल्हे, दत्तात्रय कोळी, भागवत भंगाळे, धुडकु सपकाळे, गोकुळ पाटील, भरत सपकाळे, शहर अभियंता व्ही.ओ.सोनवणे, अभियंता जितेंद्र रंधे यांच्यासह इतर पदाधिकारी, मक्तेदार, नागरिक उपस्थित होते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now