जळगाव जिल्हाजळगाव शहर
केसीई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची खेळाडू प्रज्ञा मालपुरेची कबचौ विद्यापीठ संघात निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची खेळाडू प्रज्ञा मालपुरेची 03 ते 06 एप्रिल 2022 दरम्यान श्री. खुशाल दास विद्यापीठ, हनुमानगढ, राजस्थान येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ रोप मल्लखांब (महिला) स्पर्धेसाठी कबचौ विद्यापीठ जळगाव संघात निवड करण्यात आली आहे.
प्रज्ञा मालपुरेचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक राणे, IQAC समन्वयक डॉ. शैलजा भंगाळे, उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, प्रा.प्रविण कोल्हे, प्रा.अतुल गोरडे,प्रा.पंकज पाटील, डॉ. गणेश पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.