⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

गोलाणी मार्केटमधून तरुणाची सायकल चोरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधून तरुणाची सायकल चोरी झाल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांचन नगरात राहणारा स्वप्नील गोविंदराम वाणी हा गोलाणी मार्केटमध्ये दुकानात कामाला आहे. दि.१९ रोजी तरुण कामाला आला असता सायकल दुकानासमोर लावली होती. दुपारी ४.३० वाजता तरुण खाली उतरला असता त्याला ४,६०० रुपयांची सायकल जागेवर दिसून आली नाही. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे करीत आहे.