जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत माहिती व संपर्क फलकाचे अनावरण यशवंत शितोळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र माहिती-तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थी आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व अध्यापक साठी करिअर कट्टा या माध्यमातून शासनाने हाती घेतलेल्या आवाज गुरुजनांचा वेध देशाच्या भवितव्याचा या कार्यशाळा बाबत माहिती दिली. स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने आजच्या युवकांच्या तयारीबाबत महत्त्वपूर्ण बाबी सांगितल्या या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे ,डॉ. संजय शिंगणे, आणि डॉ. क्रांती पाटील उपस्थित होते.