संकट मोचक हनुमान मंदिराच्या कळस नूतनीकरण बांधकाम परवानगीसाठी मुख्याधिकार्‍यांना निवेदन

मार्च 23, 2022 4:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव शहरातील रांजणगाव दरवाजा टाऊन हॉल येथे संकट मोचक हनुमानाचे मंदिर गेल्या अनेक वर्षापासून स्थापित आहे. मात्र या हनुमान मंदिरावर कळस नाही.आणि या मंदिराचे बांधकाम देखील जुने झालेले आहे.

chalisagaon

त्यामुळे या मंदिराचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. सदर मंदिरावर ट्रस्ट नसल्यामुळे मंदिराचे नुतनीकरण आणि कळसाचे बांधकाम करण्यासाठी तेथील स्थानिक जय हनुमान भक्त परिवाराने पुढाकार घेतला असून या मंदिराचे कळसाचे आणि नूतनीकरणाचे बांधकाम सदर भक्तपरिवार स्वखर्चाने करणार आहेत.

सदर हनुमान मंदिराचे नुतनीकरण करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत चाळीसगावचे मुख्याधिकारी यांना जय हनुमान भक्त परिवार व जय बाबाजी भक्त परिवार पाटणादेवी नाका यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.दरम्यान चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी निवेदनकर्त्यांना हनुमान मंदिराच्या परवानगीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now