सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, वाचा आजचे भाव

मार्च 11, 2022 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । रशिया-युक्रेनमधील तणाव काही अंशी निवाळल्याने गुरुवारी देशांतर्गत सोने-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या होत्या. मात्र दुसऱ्या दिवशी सोने चांदीच्या दरांमध्ये पुन्हा मोठी वाढ झाली आहे. आज जळगाव सराफ बाजार पेठेत सोन्याच्या भावात ५१० रुपयाची वाढ झाली तर चांदीच्या दरात ९१० रुपयांची वाढ झाली. त्यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने १५२० रुपयाने स्वस्त झाले होते. तर चांदी १८५० रुपयाने स्वस्त झाली होती.

gold silver 5

जळगाव सोने-चांदीचा भाव?
आज शुक्रवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,४९० रुपये इतका आहे. तर चांदी ७२,१२० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया-युक्रेन संकटामुळे (Russia-Ukraine Crisis) सोन्याच्या किंमती झरझर वाढल्या. सराफ बाजारात सोने १९ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर अर्थात ५५,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले होते. यापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२२ मध्ये सोने ५६,२०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत वधारले होते. तर चांदी ७७ हजारांवर गेली होती. मात्र त्यानंतर हळूहळू सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत गेली.

गेल्या वर्षीच्या ३१ मार्च २०२१ मध्ये सोने ४५ हजार रुपयांहून खाली गेले होते. मात्र त्यानंतर पुन्हा वाढत गेले. तर आता रशिया आणि युक्रेन (Rasia Urekain war) युद्धामुळे गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. दोन दिवसापूर्वी सोन्याच्या भावाने ५५ हजाराचा टप्पा ओलांडला होता. तर चांदी ७३ हजारावर गेली होती.

जळगाव सराफ बाजारात या आठवड्यात सोने जवळपास १५०० हजाराहून अधिकने महागले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात जवळपास २५०० हजार रुपयाची वाढ झाली आहे.

या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५३,७९० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५४,७७०, बुधवारी ५५,५००, गुरुवारी ५३,९८० इतका आहे. तर दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ७०,७८० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ७१,६१०, बुधवारी ७३,०६०, गुरुवारी ७१,२१० प्रति किलो इतका होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now