जळगाव जिल्हा

स्मार्ट उद्योजक, युवा उद्योजक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । माळी साम्राज्य ग्रुपच्या वतीने राज्यस्तरीय स्मार्ट उद्योजक व युवा उद्योजक पुरस्कार देण्यात येत असून पुरस्कारासाठी माळी समाजातील पात्र व्यक्तींनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

माळी समाजातील उद्योजकांनी उद्योजकता क्षेत्रात यशस्वी व उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून कमीत कमी पाच वर्षांत यशस्वीपणे आपला उद्योग चालवत, त्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत, पर्यावरणीय समतोल व शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या उद्योग धंद्यात विविध प्रयोग करीत तसेच रोजगाराची निर्मिती करीत आपल्या भागात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा विचार या पुरस्कारासाठी केला जाणार आहे. सामाजिक उद्योजकता (Social Entrepreneurship) या विषयात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.

राज्यातील युवांसमोर उद्योजकता क्षेत्रात आदर्श ठेवणाऱ्या उद्योजकांची कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचे पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

पुरस्काराचे स्वरू
पुरस्कार्थिना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह/ सन्मानपत्र असे असणार आहे. उद्योग क्षेत्रामधील मान्यवर व्यक्तींचा सहभाग असलेल्या निवड समितीमार्फत अंतिम पुरस्कारार्थींची निवड होणार आहे. प्रस्ताव पाठवण्यासाठी पत्ता – लुंकड मार्केट पांडे चौक जळगाव ता.जि.जळगाव, पिनकोड ४२५००१

आपण आपला प्रस्ताव या मेलवर देखील पाठवू शकतात
Gmail- [email protected] /[email protected]

Related Articles

Back to top button