जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२४ । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात प्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ. हार्दिक मोरे यांची सेवा उपलब्ध झाली असून सकाळी ९ ते ५ यावेळेत ते रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहे.
मुळचे बुलढाणा जिल्हा लोणार ता.कोउलखेडा येथील रहीवासी असलेले डॉ. हार्दिक मोरे यांनी डॉक्टरेट ऑफ मेडिसिन डीएम, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी रेसिडेन्सी प्रोग्राम जीएमसी नागपूर येथून पुर्ण केलेे असून, एमडी, मेडिसिन एसीपीएम मेडिकल कॉलेज, धुळे येथे सुर्वण पदक प्राप्त केले आहे तर एम बी बी एस पदवी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, वर्धा येथून प्राप्त केली आहे.आरसीएसएम शासकिय महाविद्यालय, कोल्हापूर येथे हृदयरोग विभागात सहाय्यक प्राध्यापक, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नागपूर येथे वरीष्ठ निवासी वैद्यकिय अधिकारी, एसएमबीटी धर्मादाय रुग्णालय, इगतपुरी, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथे वरिष्ठ निवासी वैद्यकिय अधिकारी मेडीसिन विभाग, एसीपीएम मेडिकल कॉलेज, धुळे येथे कनिष्ठ निवासी वैद्यकिय अधिकारी तर इंटर्नशिप महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम येथून पुर्ण केली आहे.
अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारच्या विषयात त्यांचे जर्नल प्रसिध्द झाले आहे. चांगली क्लिनिकल प्रॅक्टिस,क्लिनिकल संशोधन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी इमेजिंग क्लिनिकल व इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी,कोरोनरी प्रक्रिया – (जटिल अँजिओप्लास्टी, आयव्हीयुएस अँजिओप्लास्टी, सीटीओ अँजिओप्लास्टी)पेसमेकर, आयसीडी,बीएव्ही आणि बीएव्ही आणि टीएव्हीआर प्रक्रियांसारख्या वाल्व प्रक्रिया आणि एएसडी पीडीए व्हीएसडीचे बालहदयरोग उपकरण बंद करणे यावर त्यांचे प्रभुत्व आहे. गेल्या ८ ते १० वर्षापासून अनेक अत्यावस्थ हदयरोग तसेच जनरल मेडीसिन, डायबेटीक रूग्णांवर उपचाराचा त्यांचा अनुभव जळगाव व विदर्भातील जनतेला उपयुक्त ठरणार असून दरोरोज सकाळी ९ ते ५ ते डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या हदयरोग विभागात रूग्णांना मार्गदर्शन करणार आहे तरी जास्तीत जास्त रूग्णांनी त्यांच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे.