⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

के.बी. रणधीर राष्ट्रीय कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील बहादरपूर‎ येथील आचार्य शिवभक्त के.बी.‎ रणधीर यांनी‎ ‎ कोविड काळात‎ ‎केलेल्या समाज‎ ‎कार्याची दखल‎ घेवून मुंबई येथील भारतीय‎ पुरस्कार विजेते संघ व नाशिक‎ येथील साप्ताहिक स्वराज‎ आंदोलन या संस्थांनी त्यांचा‎ राष्ट्रीय कृतज्ञता पुरस्कार देवून‎ गाैरव केला आहे.‎

के. बी. रणधीर यांच्या कार्याच्या‎ गौरव व्हावा या उद्देशाने नाशिक‎ ‎येथे पंचवटी परिसरातील‎ साई-लिला लॉन्स एकता सन्मान‎ संमेलनात संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र‎ महादेव खुणे यांच्या हस्ते व‎ साप्ताहिक स्वराज आंदोलनचे‎ संपादक सुखदेव लक्ष्मण भालेराव‎ व धुळे येथील कृष्णा बेडसे या‎ प्रमुख अतिथींच्या उपस्थित के. बी.‎ रणधीर यांना शाल, श्रीफळ,‎ ट्रॉफी, सन्मानपत्र देऊन राष्ट्रीय‎ कृतज्ञता पुरस्काराने सन्मान‎ करण्यात आला. के. बी. रणधीर‎ यांनी ४० वर्षापासून‎ व्यसनमुक्ती व जल शोध यांचे‎ निस्वार्थपणे समाज कार्य सुरु‎ ठेवले आहे. याबद्दल त्यांना अनेक‎ राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय‎ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.‎

हे देखील वाचा :