गुन्हेजळगाव जिल्हायावल

पत्नीच्या खून करणाऱ्या संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील पत्नीचा खुन करणाऱ्या पतीला न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या खुनाच्या घटनस्थळाचा पंचनामा सह जळगावच्या फॉरेन्सीक युनिटने देखील या घटनास्थळावरून आवश्यक नमुने घेतले आहे. तर मयत महिलेवर सोमवारी सायंकाळी अंतसंस्कार करण्यात आले.

थोरगव्हाण येथील प्रकाश पांडूरंग पाटील (वय ६८) या वृध्द इसमाने सतत पत्नी इंदूबाई पाटील (वय ६५) यांच्या कडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणूकीच्या संतापात रविवारी त्यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जबर दुखापत करीत त्यांची हत्या केली होती. तेव्हा या प्रकरणी मयत महिलेचा मुलगा आनंदा पाटील यांच्या फिर्यादी वरून यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मयत महिलेवर सोमवारी जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तर दुपारी या खुनाच्या घटनास्थळाचा पंचनामा अपासी अंमलदार पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र खैरणार यांनी केला. तर जळगाव फॉरेन्सीक युनिटचे विकास वाघ, योगेश वराडे यांनी घटनास्थळाला भेट देत काही नमुने घेतले आहे. तर गुन्ह्यातील संशयीत प्रकाश पाटील यांना आपण केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप दिसत नव्हता त्यांना येथील न्यायालयात न्यायधिश व्ही. एस.डामरे यांच्या समोर हजर केले असता त्याना ३ मार्च पर्यंत चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र खैरणार करीत आहे.

शोकाकूल वातावरणात अंतसंस्कार

मयत इंदुबाई पाटील यांच्यावर सोमवारी जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. व सोमवारी सांयकाळी गावात त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंतसस्कार करण्यात आले.

Related Articles

Back to top button