जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील करमाड खुर्द येथील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला बळजबरीने पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला.

तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादनुसार त्यांच्या घराशेजारी राहणारा प्रमोद उर्फ पप्पू साहेबराव पाटील याने तरुणीला २४ रोजी रात्री १२ वाजेनंतर फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. घटनेनंतर प्रमोद पाटीलही गायब आहे. पुढील तपास योगेश जाधव करत आहेत.

- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






