जळगाव लाईव्ह न्यूज । फेब्रुवारी २०२२ । रावेर तालुक्यातील पातोंडी गावाजवळील नदी पात्रातून रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. या प्रकरणी दोन जणांविरोधात येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास डीवायएसपी विवेक लवांड हे गस्तीवर असताना इरफान तडवी हा त्याच्या ताब्यातील स्वराज कंपनीचे लाल रंगाच्या ट्रॅक्टरद्वारे विना परवानगी वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. ही कारवाई बंडू चौकाकडे जाणाऱ्या संभाजी नगर जवळील पुलावर करण्यात आली आहे. यावेळी शेख सौद शेख शाकीर याला पोलिसांची चाहूल लागताच ताे पळून गेला.

या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर व बजाज प्लॅटिना मोटारसायकल असा एकूण दोन लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. हवालदार रशीद रफिक तडवी यांनी फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला.
- बापरे! सासू अन् पतीने अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून मारले; पत्नीच्या हत्येचाही प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
- यावल तालुका हादरला ! आईने मुलासह घेतली विहिरीत उडी
- लग्नानंतर अवघ्या ६ व्या दिवशी नवविवाहितेचा अपघातात जागीच मृत्यू; जळगावातील दुर्दैवी घटना
- भरघोस नफ्याचे आमिष पडले महागात ; जळगावातील व्यावसायिकाची ९.३५ लाखांत फसवणूक
- मैत्रीला काळिमा! मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध, रावेरमधील ‘त्या’ हत्येचा पोलिसांकडून उलगडा, दोघे गजाआड









