जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । गोदावरी फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक संस्थांतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, आयुर्वेद, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. केतकी पाटील सभागृहात कार्यक्रम झाला.

याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. अलका पाटील, स्नेही डॉ. सुहास बोरोले, डॉ. सुरेखा बोरोले, डॉ. योगेश, डॉ. अनुराधा व प्राध्यापक आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांनी म्हटलेल्या ‘मंगल दिन आज आयो, मंगल गान सुनायो…’ या बंदिशीने झाली, त्यांना डीन डॉ. एन. एस.आर्विकर यांंनी पेटीवर साथ दिली. डॉ. किमया पारखे, डॉ. प्रमोद साळुंके यांनी सूत्रसंचालन केले.

गीत, कविता, नृत्यावर विद्यार्थ्यांनी केली धम्माल
तुझे प्यार करते है, करते रहेंगे…’ हे गीत आर्विकर दाम्पत्यानी सादर केले. याप्रसंगी डॉ.अनुराग सादर करत असलेल्या ‘एक प्यार का नगमा है, मौजो की रवानी है…’ या गीताला डॉ.उल्हास पाटील यांनी दाद दिली. डॉ.अमृत महाजन यांनी हरिवंशराय बच्चन यांची ‘मुठ्ठी में कुछ सपने लेकर…’ या कवितेचे सादरीकरण केले. प्रत्येक कॉलेजच्या ग्रुपने हिंदी, मराठी, पंजाबी गीतावर नृत्याचे सादरीकरण केले.
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?







