भुसावळात अकरावीच्या विद्यार्थिनी गळफास घेऊन आत्महत्या

फेब्रुवारी 25, 2022 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ शहरातील हुडको कॉलनीतील एका १७ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना गुरुवारी उघडकीस आली. कोमल भगवान तायडे (17) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

crime 1 jpg webp

याबाबत असे की, शहरातील हुडको कॉलनीतील रहिवासी तथा नाहाटा महाविद्यालयाची अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कोमल तायडे या युवतीने तिच्या राहत्या घरात आई खालच्या घरात असतांना वरच्या मजल्यावर येऊन दोरीने गळफास घेतला. आईने मुलीस आवाज दिल्यावर ही तिने उत्तर दिले नसल्याने आई वरच्या मजल्यावर आली असता, मुलीने गळफास घेतल्याचे दृष्य दिसले. यामुळे तिच्या आईने हंबरडा फोडला. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक गजानन पडघन, सहायक फौजदार मोहंमद अली सय्यद, समाधान पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. कोमल ही युवती नाहाटा कॉलेजला अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. तिचे वडील भगवान तायडे हे सुध्दा नाहाटा कॉलेजमध्येच नोकरीला आहे. कोमलच्या मागे दोन बहीणी, आई, वडील असा परीवार आहे. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तेथे कोठही चिठ्ठीही मिळून आली नाही, त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण काय, हे कळू शकले नाही. मृत कोमलचे पालिका रूग्णालयात विच्छेदन करण्यात आले.

भुसावळात शहर पोलिस ठाण्यात नोंद
भुसावळ शहर पोलिस ठाण्यात सतीश सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गळफास घेतलेली दोरी जप्त केली. सहायक फौजदार मोहंमद अली सय्यद पुढील तपास करीत आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now