जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याचा प्रकार बुधवारी रात्री शिरसोली प्रार्थनास्थळात घडला. या प्रकरणी ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली.

अल्पवयीन मुलीने नातेवाइकांना ‘त्या’ व्यक्तीची माहिती दिल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले. त्यानंतर रात्री येथे त्या व्यक्तीला नातेवाइकांसह नागरिकांनी पकडून चोप दिला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. वेळीच पोलीसपाटील शरद पाटील यांनी मोठ्या जिकिरीने त्या व्यक्तीला जमावातून कसेबसे वाचवून औद्योगिक पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






