रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचा उडाला भडका; वाचा आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

फेब्रुवारी 24, 2022 11:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत भडका उडाला आहे. आज गुरुवारी ब्रेंट क्रूडचा भाव १०० डॉलरवर गेला. मागील सात वर्षांतील हा उच्चांकी भाव आहे. दरम्यान, आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.

petrol diesel

मुंबईत आज २४ फेब्रुवारी रोजी एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. तर देशात सर्वात कमी दरात पेट्रोल आणि डिझेल दिल्लीजवळील नोएडा शहरात मिळत आहे. नोएडामध्ये आज एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.५१ रुपये आहे.

आज एक लीटर डिझेलचा मुंबईत ९४.१४ रुपये भाव आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे. नोएडामध्ये आज एक लीटर डिझेल दर ८७.०१ रुपये आहे.

दोन महिन्यांपासून भाव पेटले आहेत
कच्च्या तेलाच्या किमती पेटल्या आहेत. 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, गेल्या दोन महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 68.87 होती. जे आता प्रति बॅरल $100 च्या पातळीवर व्यापार करत आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीपासून 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now