जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव येथे ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार व तिच्या लहान बहिणीचा विनयभंग झाल्याची घटना २० रोजी घडली होती. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त करत आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी व हा खटला जलद न्यायालयात चालवण्यात यावा आणि पिडीत कुटुंबाला शीघ्रतेने शासकीय मदत मिळावी. अशी मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना देण्यात आले.

निवेदनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवती जिल्हाध्यक्षा कल्पीता पाटिल, महिला जिल्हा उपाध्यक्ष मिनाक्षीताई चव्हाण, महानगर सरचिटणीस सुनीलभाऊ माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, अकिल पटेल, विशाल देशमुख, सुशील शिंदे, दिपीका भामरे, अभिलाषा रोकडे, आशा अंभोरे, सुष्मीता भालेराव, जयश्री पाटिल, छाया केळकर, राहुल टोके, सुहास चौधरी, शंभू रोकडे, चंद्रमणी सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






