जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । शहरातील एका कॉलनीत प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली. त्यात तरुणाची गंभीर दुखापत झाली असून प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी दुपारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जखमी तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री धरणगाव तालुक्यातून जळगाव शहरातील घरी आल्यावर मुलाला किराणा दुकानावर झाला. दूध घ्यायला पाठविले असता तेथून परत येत असताना सम्राट कॉलनीत एका तरुणाने रस्त्यात अडवून तुझे माझ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध आहेत, या कारणावरून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली असता मुलाला काही लोकांनीच शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. ज्या मुलावर हल्ला झाला तो फुले मार्केटमध्ये कापड दुकानावर कामाला आहे. त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत, हे त्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीतही म्हटले आहे.

- भुसावळात भल्यापहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ ! ६० सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती, अनेक जण ताब्यात..
- जळगावात घरफोडीचा गुन्हा उघड ! दोन अट्टल चोरटे जेरबंद; ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
- जळगावातील महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, चौघे गंभीर जखमी
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल
- कर्जबाजारीपणा अन् नैराश्यातून अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल








