प्रफुल्लसिंग राजपूत यांचे नेट परीक्षेत यश

फेब्रुवारी 21, 2022 1:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । पाचोरा येथील प्रफुल्लसिंग सुवर्णसिंग राजपूत हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) उत्तीर्ण झाले आहे.

p. rajput

त्यांनी पाचोरा येथील एस.एस.एम.एम. कॉलेज येथे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या यशामध्ये त्यांना भा.ना. गाडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नेट परीक्षेत यश मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सध्या ते खान्देशी कृषीसंस्कृती या विषयावर पी.एच.डी. चा अभ्यास करत आहे. त्यांचे वडील पाचोरा येथे एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now