जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । जिल्ह्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टी जळगांव’ची “विस्तृत आढावा बैठक” माजी मंत्री आ. गिरिष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी खासदार रक्षा खडसे उपस्थित होत्या.

बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना पक्ष संघटन, बुथ रचना व आगामी येणाऱ्या निवडणूक सारख्या विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, येणाऱ्या सर्व निवडणूका भाजपा स्वबळावर लढवणार असून त्यासाठी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी तयार रहा असे यावेळी आव्हान करण्यात आले. जि.प.चे संख्याबळ हे ७७ होण्याची शक्यता असून यात भारतीय जनता पक्षाने मिशन ४०+ हे ध्येय समोर ठेवले आहे.

यावेळी माजी मंत्री आ. गिरिष महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजुमामा), भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, किशोरजी काळकर, आ.संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण, माजी आ.स्मिताताई वाघ, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योती पटतील, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव भरत महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, डी.एस.चव्हाण, गोविंद अग्रवाल, जि.प.सदस्य पोपटतात्या भोळे, हर्षल पाटील, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा तालुकाध्यक्ष, कार्यकारणी सदस्य, भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








