जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । केसीई सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे, सतिश भोळे, एकनाथ पांडे यांनी प्रतिमा पुजन व माल्यार्पण केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पाळणा व पोवाडे सादर केले.शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य स्थापन करण्यात आलेल्या संघर्षमयी जीवन प्रवासावर विद्यार्थ्यांनी प्रकाश कला व आजच्या पिढीला सुध्दा महाराज कसे उर्जा स्त्रोत व आदर्श आहेत याचे महत्त्व पटवून दिले. संस्कृती व परंपरा कायम ठेवण्यासाठी आजच्या पिढीला पाश्चिमात्य संस्कृतीची भुरळ घातली जाते व उदात्तीकरण केले जाते. भारतीय संस्कृती व महाराजांचे कार्य किती महान आहेत याची जाणीव करून दिली. व आजच्या काळात असे मुल्य शिक्षण घेतले तर भारत नक्कीच जगात आदर्श राष्ट्र म्हणून ओळख कायम राखेल अशा भावना व्यक्त केल्या.
सूत्रसंचालन पराग राणे यांनी केले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू भगिनींनी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..