⁠ 
शनिवार, मे 18, 2024

२४ तासात पर्दाफाश : सराफ व्यापाऱ्याला लुटणारे चौघे गजाआड, एक फरार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । माळपिंप्री येथील सोने-चांदीचे व्यापारी राजेंद्र विसपुते यांच्या दुचाकीला धडक देऊन यांच्यावर हल्ला करून सुमारे साडेदहा लाखांचा ऐवज लुटून नेणाऱ्या लुटारु भामट्यांना पोलिसांनी केवळ २४ तासात अटक केली आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी फरार आहे.

एरंडोल तालुक्यातील माळपिंप्री येथील राजेंद्र विसपुते यांचे रवंजा येथे सोने-चांदीचे दुकान आहे. काल दुपारी २ वाजेच्या सुमारास विसपुते हे दुकान बंद करून घराकडे जात असताना विखरण मार्गावरील टेकडीजवळ त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या ५ जणांनी त्यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांच्यावर चाकूचे वार करून जखमी केले. त्यांच्याजवळील सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेवून विसपुते यांच्याच दुचाकीने पसार झाले होते.

दरम्यान, एरंडोल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी घटनेची माहिती मिळताच सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना परिसरात आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. अमळनेर विभागाचे पोलिस अधीक्षक राकेश जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली हाेती. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी दिगंबर उर्फ डिग्या रवींद्र सोनवणे (रा. भोकर ता. जि. जळगाव), विशाल आतून सपकाळे (रा. विठ्ठलवाडी, जळगाव), विशाल लालचंद हरदे (रा. चौगुले प्लॉट, जळगाव) व संदीप राजू कोळी (रा. चौगुले प्लॉट, जळगाव) या चाैघांना अटक केली. तर आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे हा फरार झाला आहे.