दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

फेब्रुवारी 17, 2022 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । शहरातील विविध भागातून दुचाकी लांबविणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ( रूपेश पाटील रा.साखरे ता.धरणगाव ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पाच दुचाकी हस्तगत केल्या आहे.

crime 36 jpg webp

सविस्तर असे की, जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहे. संशयित आरोपी रूपेश संजय पाटील रा. साखरे ता. धरणगाव हा त्याच्या साथीदारासह जळगाव शहरात दुचाकींची चोरी करत असल्याचे गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, युनुस शेख, रमेश जाधव, पोलीस हवलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोर, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे, पोना राहुल पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील, प्रविण मांडोळे, उमेश गोसावी, हेमंत पाटील, दिपक शिंदे, मुबारक देशमुख यांनी सापळा रचुन संशयित आरोपी रूपेश पाटील याला अटक केली. त्याच्या कडून चोरीच्या एकुण पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

त्याने दिलेल्या कबुलीतून व हस्तगत करण्यात आलेल्या चोरीच्या दुचाकीच्या माध्यमातून जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनमधील २, जळगाव शहर पोलिस स्टेशनमधील २ व पंचवटी पोलिस स्टेशन नाशिक येथील एक असे एकुण ५ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासकामी त्याला जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now