कोल्हे हील्स परिसरात आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह

फेब्रुवारी 17, 2022 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । शहरातील वाघनगर येथील कोल्हे हिल्स परिसरात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला आहे. या घटनेमुळे कोल्हे हील्स परिसरात खळबळ उडाली आहे.

death 58

सविस्तर माहिती अशी की, वाघ नगर येथील कोल्हे हिल्स परिसरात मंगळवार दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अंदाजे २५ वर्षीय तरूणाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयत तरूणाची अद्याप ओळख पटलेली नसून त्या मयत तरुणाने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेमागे आणखी काही वेगळे कारण आहे का याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह रात्री ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलीसांनी केले आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास अनिल फेगडे हे करीत आहे.

हे देखील वाचा:

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now