यावलात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी अल्पवयीन मुलीचे अपहरण

फेब्रुवारी 17, 2022 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचे वृत्त समोर आले आहे. विषेशत: ही घटना ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी घडली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

crime 18 jpg webp

पिडीत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाकडून यावल पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादी नुसार सोमवारी रोजी त्यांची १४ वर्षीय मुलगी शाळेत जाण्या करीता घरून निघाली होती. तर ती दुपार पर्यंत घरी परतली नाही त्यामुळे आई, वडीलांनी शाळेत व तिच्या मैत्रीणी सह नातेवाईकडे शोध घेतला मात्र, ती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी रात्री यावल पोलीसात धाव घेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणी तरी फुस लावून तिचे अपहरण केले असावे अशी तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now