सोने-चांदीच्या भावात प्रचंड वाढ, सोने ५१ हजारांवर, जाणून घ्या आजचे दर

फेब्रुवारी 17, 2022 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२। रशिया-युक्रेन या देशादरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे. जळगाव सुवर्णनगरीत आज मंगळवारी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज सोन्याच्या भावात ८२० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने दराने प्रतितोळा ५१ हजारांचा टप्पा गाठला. तर दुसरीकडे चांदीच्या भावात १२८० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने १७० रुपयाने महागले होते. तर चांदी २९० रुपयाने स्वस्त झाले होते.

gold silver price jalgaon

आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१,०९० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६५,७४० रुपये प्रति किलो इतका आहे.दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते.

सोने आणि चांदी दरात गेल्या आठवड्यापासून दरवाढ सुरु आहे. झालेली दरवाढ ही आंतरराष्ट्रीय जगतातील घडामोडीवर झाली असून ती तात्पुरती असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला. आगामी सहा-आठ दिवसांत वाढलेले दर पुन्हा खाली येतील, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

जळगाव सुवर्णनगरीत गेल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून सोने चांदीच्या भावात तेजी दिसून आली. गेल्या आठवड्याच्या सोन्याच्या भावात तब्बल १०६० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी तब्बल २५९० रुपयांनी महागली आहे. दरम्यान, काल (सोमवार) आणि आज (मंगळवार) या दोन दिवसात सोने ९९० रुपयांनी महागले आहे.

गेल्या आठवड्यातील दर

सोने दर :
७ फेब्रुवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा
८ फेब्रुवारी (मंगळवार) ४९,३६० रुपये प्रति तोळा
९ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,५६० रुपये प्रति तोळा
१० फेब्रुवारी (गुरुवार) ४९,८०० रुपये प्रति तोळा
११ फेब्रुवारी (शुक्रवा) ५०,१०० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
७ फेब्रुवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,२८० प्रति किलो
८ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६३,४९० प्रति किलो
९ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६३,८३० प्रति किलो
१० फेब्रुवारी (गुरुवार) चांदीचा दर ६४,१६० प्रति किलो
११ फेब्रुवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६४,७५० प्रति किलो

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now