⁠ 
शनिवार, मे 18, 2024

आगामी जि.प. व पं.स.च्या निवडणूका संदर्भात आढावा बैठक संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । जळगाव येथे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका संदर्भात अमळनेर धरणगाव व जळगाव या तालुक्यांचा आढावा बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात आली. बैठकीमध्ये संभाव्य उमेदवारांची संदर्भात आराखडा घेण्यात आला तसेच आगामी निवडणुका कश्याप्रकारे जिंकता येतील व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य जास्तीत जास्त कसे निवडून आणता येतील यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, जळगाव तालुका अध्यक्ष हेमंत कोळी, जळगाव तालुका सचिव भरत पाटील, तालुका उपाध्यक्ष उमेश धनगर तालुका उपाध्यक्ष शैलेश चौधरी, नशिराबाद शहराध्यक्ष जितेंद्र भराटे, नशिराबाद शहर सचिव गोकुळ धनगर, धरणगाव तालुका अध्यक्ष हेमंत महाजन, धरणगाव तालुका सचिव राजू बाविस्कर, आदी सर्व मनसे पदाधिकारी उपस्थित होते

हे देखील वाचा: