Gold-Silver : आजचा सोने-चांदीचा भाव : १४ फेब्रुवारी २०२२

फेब्रुवारी 17, 2022 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । जळगाव सुवर्णनगरीत सोने दरवाढीचा आलेख चढताच आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने (Gold Rate) दरात पुन्हा वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या (Silver Rate) दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सोमवारी १० ग्रॅम सोन्याच्या दरात १७० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी प्रति किलो २९० रुपयाने स्वस्त झाली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सोने ३०० रुपयांनी महागले होते. तर चांदी ५९० रुपयांनी महागले होते.

gold rate 2

आज सोमवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०,२७० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६४,४६० रुपये प्रति किलो इतका आहे.दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते.

जागतिक बाजारातील नकारात्मकतेचे पडसाद भारतीय सराफ बाजारात दिसून आले. गेल्या अनेक दिवसापासून सोने चांदीचे वरच्या दिशेने जात आहे. जळगाव सुवर्णनगरीत गेल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून सोने चांदीच्या भावात तेजी दिसून आली. गेल्या आठवड्याच्या सोन्याच्या भावात तब्बल १०६० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी तब्बल २५९० रुपयांनी महागली आहे.

दरम्यान, येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यातील दर

सोने दर :
७ फेब्रुवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा
८ फेब्रुवारी (मंगळवार) ४९,३६० रुपये प्रति तोळा
९ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,५६० रुपये प्रति तोळा
१० फेब्रुवारी (गुरुवार) ४९,८०० रुपये प्रति तोळा
११ फेब्रुवारी (शुक्रवा) ५०,१०० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
७ फेब्रुवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,२८० प्रति किलो
८ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६३,४९० प्रति किलो
९ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६३,८३० प्रति किलो
१० फेब्रुवारी (गुरुवार) चांदीचा दर ६४,१६० प्रति किलो
११ फेब्रुवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६४,७५० प्रति किलो

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now