- जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांचा निकालानंतर सोमवारी सुवर्णपदक धारकांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अर्चना महेश पंजाबी हिने प्रावीण्य मिळवले आहे. ती राज्यातून पाचवी आली असून औषधशास्त्र विषयात राज्यातून प्रथम आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची अर्चना महेश पंजाबी या विद्यार्थिनीने सर्वोत्तम यश मिळवले आहे. पहिल्या वर्षी देखील तिने महाविद्यालयातून उत्तम गुणांकन प्राप्त केले होते. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निकालातही तिने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचे नाव उंचावले आहे.

राज्यभरातून ती पाचवी आली असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय औषधशास्त्र विषयांमध्ये ती राज्यातून प्रथम आली असून सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. तिच्या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ. किशोर इंगोले, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.इमरान तेली यांनी अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयांमध्ये तासिकामध्ये शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन आणि सोप्या पद्धतीने केलेला अभ्यास यामुळे यश मिळवणे सोपे गेले. यशामध्ये शिक्षक वर्गासह पालकांचा मोठा वाटा आहे. यशामुळे प्रोत्साहन मिळाल्याने तृतीय वर्षाला देखील मोठ्या उत्साहाने अभ्यास करणे सोपे जाणार आहे. असे मत अर्चनाने व्यक्त केले.
हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?









