⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | खड्ड्यात दुचाकी हळू केली अन्..कंटेनरने दुचाकीला उडविले, दोन जागीच ठार

खड्ड्यात दुचाकी हळू केली अन्..कंटेनरने दुचाकीला उडविले, दोन जागीच ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । खड्ड्यात दुचाकी हळू केल्यावर मागूून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात कंटेनरने दुचाकीला जबर धडक देऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुणी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शिरपूर तालुक्यातील तरडी गावाजवळ शनिवारी घडली.

याबाबत असे की, चाेपड्याकडून तीन जण दुचाकी (एमएच- १८, बीव्ही- ३८५३)ने शिरपूरकडे जात हाेते. दरम्यान, तरडी गावाच्या अलीकडे रस्त्यावर मोठा खड्डा आहे. या खड्ड्यात दुचाकी चालक तरुणाने दुचाकी हळू केली. या वेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. त्या दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोघे तरुण रुग्णवाहिका येण्यापूर्वीच गतप्राण झाले होते. या अपघातातील दोन्ही मृत नेमके कुठले? याची रात्री उशिरापर्यंत माहिती मिळाली नसून त्यांची ओळख पटली नव्हती. तर या अपघातात यावल तालुक्यातील वाघझिरा येथील २२ वर्षीय भारती भावसिंग पावरा यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

त्यांना तत्काळ शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकाद्वारे उपचारार्थ दाखल केले हाेते. प्रथमाेपचार करुन नंतर त्यांना शिरपूरहुन धुळ्याला हलवल्याचे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.