‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूच्या कारणाचा शवविच्छेदनानंतर झाला उलगडा, आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

फेब्रुवारी 17, 2022 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । पाचोरा तालुक्यातील विष्णू नगर (गाळण) येथे मनीषा चेतन राठोड (वय २४) या विवाहितेच्या मृत्यूच्या कारणाचा शवविच्छेदनानंतर उलगडा झाला आहे.मनीषा राठोड यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

New Project 3 jpg webp

काय आहे घटना?
पाचोरा तालुक्यातील विष्णू नगर (गाळण) येथे कुंडाणे तांडा येथील माहेर असलेल्या मनीषा राठोड हिचा ४ फेब्रुवारीला रात्री संशयास्पद मृत्यू झाला होता. सासरच्या मंडळींनी तिचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बतावणी केल्याने पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मनीषाच्या गळ्यावर दोरी आवळ्याच्या व नखे लागल्याच्या खुणा आढळल्याने तिचा भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ पवार याने मनीषाचे शवविच्छेदन पाचोरा येथे न करता ते जळगाव इन-कॅमेरा करण्याची मागणी केली हाेती.

त्यानुसार ५ रोजी दुपारी १ वाजेदरम्यान जळगाव जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सोनार यांनी इन-कॅमेरा शवविच्छेदन केले. त्यानंतर पाचोरा पोलिसांना सादर केलेल्या अहवालात मनीषा राठोड यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने ज्ञानेश्वर पवार यांनी फिर्याद दिली. त्यावरुन मनीषाचा पती चेतन राठोड, जेठाणी, जेठ जयसिंग राठोड व दीर भगवान दलेरसिंग राठोड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे करत आहे.

दरम्यान, मनीषाला ९ महिन्यांचा यश नावाचा मुलगा आहे. त्यास पती चेतन राठाेड याच्याकडे सोपवण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now