जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील आचार्य शिवभक्त के.बी. रणधीर यांनी कोविड काळात केलेल्या समाज कार्याची दखल घेवून मुंबई येथील भारतीय पुरस्कार विजेते संघ व नाशिक येथील साप्ताहिक स्वराज आंदोलन या संस्थांनी त्यांचा राष्ट्रीय कृतज्ञता पुरस्कार देवून गाैरव केला आहे.
के. बी. रणधीर यांच्या कार्याच्या गौरव व्हावा या उद्देशाने नाशिक येथे पंचवटी परिसरातील साई-लिला लॉन्स एकता सन्मान संमेलनात संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र महादेव खुणे यांच्या हस्ते व साप्ताहिक स्वराज आंदोलनचे संपादक सुखदेव लक्ष्मण भालेराव व धुळे येथील कृष्णा बेडसे या प्रमुख अतिथींच्या उपस्थित के. बी. रणधीर यांना शाल, श्रीफळ, ट्रॉफी, सन्मानपत्र देऊन राष्ट्रीय कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. के. बी. रणधीर यांनी ४० वर्षापासून व्यसनमुक्ती व जल शोध यांचे निस्वार्थपणे समाज कार्य सुरु ठेवले आहे. याबद्दल त्यांना अनेक राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी