जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । रिक्षेत बसलेल्या वृद्ध प्रवाशाला लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली. विद्युत कॉलनीजवळ ही घटना घडली हाेती. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल झाला आहे.

शेख जलील शेख इब्राहिम (वय ७२, रा. पंचशीलनगर, तांबापुरा) यांच्या धुळे येथील मुलीने जळगावच्या फायनान्स कंपनीतून सोने तारण कर्ज घेतले हाेते. त्यासाठी १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तारण ठेवले होते. दरम्यान, मंगळसूत्र सोडवून ते धुळे येथे मुलीला देण्यासाठी शेख बुधवारी सकाळी रिक्षेत बसले. तत्पूर्वीच रिक्षाचालकासह तीन व्यक्ती त्या रिक्षेत बसलेल्या होत्या. विद्युत कॉलनीजवळ चालकाने गर्दी असल्याचे सांगून त्यांना रिक्षेतून उतरून दिले. त्या वेळी शेख यांनी मंगळसूत्र बघितले असता चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

अटक केलेले संशयित
मोसीन खान नूरखान पठाण (वय २०, रा. पिंप्राळा-हुडको), शाहरुख शेख रफिक (वय २०, रा. पिंप्राळा-हुडको) व समाधान सुमेरसिंग पाटील (वय ३३, रा. खंडेरावनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल
- कर्जबाजारीपणा अन् नैराश्यातून अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- अट्टल मोटारसायकल चोर पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात ; चार दुचाकी हस्तगत
- चोपड्यात अमली पदार्थांवर पोलिसांचा दणका; ७ किलो गांजासह तीन तस्करांना अटक!
- जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू









