देवकर रूग्णालयात मिळाली १७५ जणांना नवी दृष्टी

फेब्रुवारी 17, 2022 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने १७५ जणांना धुसर दृष्टीपासून मुक्त करून नव्या प्रकाशवाटा दाखवल्या आहे.

shastrakriya jpg webp

रुग्णालयातर्फे जानेवारी महिन्यापासून ना नफा ना तोटा तत्वावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविले जात असून, दर गुरुवारी रुग्णांवर अत्यल्प दरात मोतीबिंदू व फेको (बिना टाक्याची) शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या गुरुवारी देखील 25 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यापैकी 75 टक्के रुग्णांनी फेको शस्त्रक्रियेला पसंती दिल्याचे दिसून आले. रुग्णालयात शस्त्रक्रियांचा हा सातवा आठवडाही हाउसफुल ठरला.

गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता देवकर रुग्णालयाने ना नफा ना तोटा तत्वावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियान सुरू केले आहे. अभियानात आतापर्यंत 175 पेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. केवळ 2500/-रुपयात मोतीबिंदू व केवळ सहा हजार रुपयात फेको (बिनटाक्याची) शस्त्रक्रिया केली जात आहे. रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवकर रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

संपर्क मो. 9370935252

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now