जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । भारतीय सैन्य दलामधून निवृत्त झालेल्या जवानाची ग्रामस्थांकडून सन्मान करण्यात आला.

सविस्तर असे की, पारोळा तालुक्यातील करमाड बुद्रुक गावाचे रहिवासी गोविंदा राजाराम पाटील हे भारतीय सैन्य दलामधून निवृत्त झाले असून यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या निवृत्तीबद्दल सन्मान करण्यात आला.

सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, सुकदेव पाटील, मोतीलाल पाटील, रावसाहेब पाटील, कोमल पाटील, जवान मुकेश पाटील, जवान गरुड, जवान नितिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जवान गरुड यांनी देश सेवेचा आनंद वेगळा असल्याचे सांगून तरुणांनी सैन्य दलातील भरतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सुशील पाटील यांनी आभार मानले.
हे देखील वाचा :
- डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
- डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती
- सालदाराकडून वृद्ध मालकिणीचा बेल्टने गळा आवळून खून ; रावेरातील घटनेने खळबळ
- बाप्पाच्या विसर्जनावर हवामानाचं सावट! जळगावात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा अलर्ट
- तरसोद-पाळधी बायपासवर पुन्हा भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू






