पिंप्राळा येथे चार माेबाइल लांबवले

फेब्रुवारी 17, 2022 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । पिंप्राळा बाजारात बुधवारी भाजीपाला खरेदी करताना चोरट्यांनी आयफोनसह चार मोबाइल चोरून नेले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

crime

प्रशांत रामकृष्ण निखाडे (रा. देवरामनगर, कमला पार्क) हे बुधवारी सायंकाळी ६ वाजता पिंप्राळा भाजीपाला बाजारात गेले होते. साेबत ऍपल कंपनीचा मोबाइल होता. भाजी घेण्यासाठी खाली वाकले असताना चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाइल लांबवला. त्यांचा मोबाइल ऍपल वॉचला कनेक्ट होता. चोरट्याने मोबाइल चोरताच वॉच डिस्कनेक्ट झाली. त्यानंतर मोबाइल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now