जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२। जळगाव तालुक्यातील शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ दापोऱ्याच्या तरुणाने रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली. विनोद सखाराम पाटील (वय-३०) रा. दापोरा ता. जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील दापोरा येथील रहिवाशी विनोद पाटील हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान अंतरावर खांबा क्रमांक ४०६/२७-१ दरम्यान युवकाने डाऊनलाईनवर जाणा-या मालगाडी समोर स्वताला झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही.
दापोरा येथील पोलीस पाटील जितेंद्र गवंदे यांना खबर मिळाल्यावरून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबत तालुका पोलीस ठाण्यात खबर दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून पुढील तपास तालुका पोलीस करीत आहे. मयत हा अविवाहित असून आपल्या आई व भाऊसोबत राहतो.
हे देखील वाचा :
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक
- जळगावमध्ये तापमानात मोठी वाढ, थंडीही ओसरली; आता पुढे कसं राहणार हवामान? वाचा..
- अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केले; पद्मभूषण सई परांजपे
- Gold Price : जळगावच्या सुवर्णबाजारात घसरणीनंतर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ
- धक्कादायक ! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात दाखल