दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू; पाचोऱ्यातील दुर्दैवी घटना

ऑक्टोबर 4, 2024 2:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात नवरात्रोत्सवात दांडिया खेळताना चक्कर येऊन कोसळून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लखन वाधवाणी असे मृत्यू झालेल्या तरुणाची नाव असून या घटनेने एकच खळबळ उडाली.

lakhan

याबाबत असे की, नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंधी कॉलनी रोडवर असलेल्या, गरबा महोत्सवात दांडिया खेळत असताना सिंधी कॉलनी येथील रहिवासी असलेल्या लखन वाढवानी या तरुणाला अचानक चक्कर येऊन तो खाली कोसळल्याने सहकाऱ्यांनी त्यास तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, नवरात्रउत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या दुर्घटनेमुळे पाचोरा शहरावर शोककळा पसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now