जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । लमांजन येथे शेतात गुरे चारून पिकांचे नुकसान करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुराख्यांसह १४ जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील म्हसावद येथील योगेश एकनाथ सोनवणे (४३) यांच्या शेतात ३१ जानेवारी रोजी काही गुराख्यांनी गुरे चरायला सोडली. या गुरांमुळे शेतातील लिंबू व हरभरा या पिकांचे नुकसान झाले. त्याचा जाब विचारला असता संबधितांनी योगेश सोनवणे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. योगेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी सुधाकर युवराज पाटील, विठ्ठल वाल्मिक पाटील, अनिल भीमराव पाटील, दीपक मधुकर पाटील, भैय्या भीमराव पाटील, बापू भीमराव पाटील, अशोक रामचंद्र पाटील यांच्यासह इतर सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास प्रदीप पाटील करीत आहेत.

हे देखील वाचा :
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






