जामनेरजवळ बिबट्याचा अपघाती मृत्यू

फेब्रुवारी 17, 2022 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । जामनेरपासून-बोदवड रोडवरील ऋृषीकेश नर्सरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री आठ वाजेदरम्यान हा अपघात झाला.

accident 4 jpg webp

ऋषीकेश नर्सरीसमोर नर बिबट्यास बोदवडकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात बिबट्या जागीच गतप्राण झाला. लहसर जंगलाला लागून असलेल्या या वनक्षेत्रात बिबट्यांचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.वनपाल प्यारेलाल महाजन, वनरक्षक प्रसाद भारूडे, संदीप पाटील, विकास गायकवाड, अशोक ठोंबरे, चरणदास चव्हाण, विजय चव्हाण यांनी बिबट्याचा मृतदेह वन कार्यालयात आणला. बिबट्याचे शवविच्छेदन होणार आहे. घटनास्थळाजवळ वस्ती ज्या ठिकाणी बिबट्याचा मृत्यू झाला, त्याच्या विरुद्ध दिशेला शेतात राखण करणाऱ्या मजुरांचा रहिवास आहे. त्या ठिकाणी बकऱ्या, कोंबड्या असल्याने हा बिबट्या शिकारीसाठी या भागात आला असावा, असा अंदाज आहे.

हे देखील वाचा :

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now