भुसावळात जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला
जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । तीन वर्षांपूर्वी झालेल्या वादाच्या वैमनस्यातून एकाने २२ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.३१) रात्री जामनेर रोडवरील दीनदयाल नगरात घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली. चाकू हल्ल्यात गुलाम गौस कालू शहा (वय २२, रा. मुस्लीम कॉलनी, बोहरी मशिदजवळ, भुसावळ) हा तरुण जखमी झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तीन वर्षांपूर्वी दारू पिण्याच्या कारणावरून गुलाम शहा याचे शेख अरबाज शेख (रा.भुसावळ) याच्यासोबत भांडण झाले होते. नंतर हे भांडण सामोपचाराने मिटले होते. मात्र, सोमवारी (दि.३१) साडेसात वाजता जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून शेख अरबाज शेख याने गुलाम गौस हे जामनेर रोडवरील दीनदयाल नगराजवळ उभे असताना अचानक मागून येवून पाठीवर चाकूने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने ते जमिनीवर कोसळले. नंतर संशयित पसार झाला. काही लोकांनी जखमीला डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल