जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । २३ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी जळगाव तालुक्यातील खेडी कडोली येथे घडली. मयूर नंदूलाल पाटील वय-२३ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते.
याबाबत असे की, मयुर पाटील हा आई, वडील, भाऊ यांच्यासह खेडी कडोली येथे वास्तव्याला आहे. शेती काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो मंगळवार 1 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घरी कोणीही नसताना मयूरने गुरांच्या गोठ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी घरातील नातेवाईक गोठ्यात गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता हा प्रकार लक्षात आला. यावेळी त्याचे आई, वडील यांनी मुलाचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला होता.
शेजारच्या नातेवाईकांनी खाली उतरून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांनी आक्रोश केला होता. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
हे देखील वाचा :
- Bhusawal : 20 हजार रुपयाची लाच घेताना महावितरणचा उपकार्यकारी अभियंता जाळ्यात
- Pachora : पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांची आकडेवारी समोर
- Jalgaon : आगीच्या घटनेनं धावत्या गाडीतून उड्या मारल्या, पण दुसऱ्या एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले..
- जळगावात आगीच्या भीतीने प्रवाशांनी एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; पण समोरून येणाऱ्या एक्प्रेसने अनेकांना चिरडले
- जळगावातील कालिंका माता चौकात पुन्हा अतिक्रमणाची परिस्थिती निर्माण