⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सावदा नगरपरिषदेत शिवसेनेची स्वबळाची तयारी ? 

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । आगामी सावदा नगरपरिषदेची नवडणूक चांगलीच रंगद्दार होणार आहे. कारण या निवडणुकित शिवसेना स्वबळाची तयारी करत असल्याचे वृत्त समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वबळाची चाचपणी केल्याचे वृत्त आहे.

 

शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार रोजी विश्रामगृहावर पार पडली. यावेळी आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, सावदा शहरात आपण जनतेची कामे आपण जी करीत आहोत ती आमदारांच्या मार्फत होत आहे.त्याची माहिती जनते पर्यंत शिवसैनिकांनी पोहोचवावी.सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी पालिकेतून जर नाहरकत दाखले देण्यास टाळाटाळ केली नसती तर आता जेवढा निधी शहरासाठी उपलब्ध करून दिला त्या पेक्षा कितीतरी पटीने उपलब्ध करून दिला असता. शिवसेना सार्वजनिक काम करण्यासाठी पुढाकार घेत असते त्या माध्यमातून आपण जनतेची कामे करीत आहोत आगामी निवडणुकीत आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवण्याची असल्याने सर्वांनी स्वबळाची तयारी करावी व सर्व नागरिकांपर्यंत आपण करीत असलेल्या कामाची व शासकीय योजनांची माहिती पुरवावी. यामुळे आमदारांनी स्वबळाचा नारा दिल्याचे मानले जात आहे. यामुळे येथील नगरपालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे. तर ऐन वेळेस अजून काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता देखील आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, मिलिंद पाटील,मिलिंद पाटील,माजी नगरसेवक श्याम पाटील, शहर प्रमुख सुरज परदेशी, उपशहरप्रमुख गौरव भैरवा, शहर संघटक नीलेश खाचणे ,शरद भारंबे युवासेना शहर प्रमुख मनीष भंगाळे, गणेश माळी, वेडु लोखंडे ,किरण गुरव ,नितीन सपकाळे,चेतन माळी आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.