⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चाळीसगावात १ लाख ३५ हजारांच्या विक्रमी किमतीत बैलजोडी विक्री

चाळीसगावात १ लाख ३५ हजारांच्या विक्रमी किमतीत बैलजोडी विक्री

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । चाळीसगाव येथील बाजार समितीत शनिवारी तब्बल १ लाख ३५ हजार रुपये अशा विक्रमी किमतीत बैलजोडीची विक्री झाली. लक्ष्मण अप्पा बोराडे या बैल व्यापाऱ्यांकडे उच्च प्रतीची व देखणी बैलजोडी विक्रीस आली हाेती. ही देखणी बैलजाेडी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली हाेती.

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्षभर चांगल्या प्रतीचे बैल, गोरे, गाई, म्हशी व शेळ्यांची खरेदी व विक्री होते. अनेक व्यापारी व शेतकरी शेजारच्या जिल्ह्यांमधून गुुरे खरेदी-विक्रीसाठी येथे येतात. चांगल्या प्रतीचे गुरु मिळत असल्याने शेतकरी, व्यापारी, बागायतदार माेठी हजेरी लावतात. शनिवारी चाळीसगाव बाजार समितीत लक्ष्मण अप्पा बोराडे या बैल व्यापाऱ्यांकडे उच्च प्रतीची व देखणी बैलजोडी विक्रीस आली हाेती. या बैलजोडीची उंची तसेच शिंग, लांबी, खांदे, अंगाची ठेवण हे बैल शौकिनांना पाहण्यासारखे होते. त्यामुळे ही बैलजोडी घेण्यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांची चढाओढ लागली. एक लाखांपेक्षा जास्त किंमत असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी बोलीही लावली. अखेर मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील अशोक गंगाराम खैरनार या शेतकऱ्याने १ लाख ३५ हजार रुपयांना ही बैलजोडी खरेदी केली. येथील बाजार समितीत बैलजोडी खरेदी-विक्री व्यवहारात हा विक्रमी उच्चांक असल्याची चर्चा दिवसभर सुरू हाेती.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह