जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । शहरात चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेन दिवस वाढत असल्याचे वृत्त दररोज ऐयकायला येत आहे. २७ रोजी जुना खेडीरोडवरील ज्ञानदेवनगर परिसरातून दोन गुरे चोरट्यांनी चोरी नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक पांडुरंग कोल्हे (वय ६०) यांच्या मालकीचे हे गुरे आहेत. मध्यरात्री चोरट्यांनी १८ हजार रुपये किमतीचे दोन गुरे चोरून नेले. २८ रोजी पहाटे पाच वाजता ही घटना उघडकीस आली. कोल्हे यांनी गोऱ्ह्यांचा परिसरात शोध घेतला; परंतु ते मिळून आले नाही. याप्रकरणी कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा :
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






