जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । चोरट्यांचा धुमाकूळ शहरासह ग्रामीण भागातही दिवसेन दिसव वाढत आहे. जामनेर येथील शास्री नगरमधील चार शेतकऱ्यांची गुरे महागड्या कारमधून चोरट्यांनी चाेरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, चोरटे सीसीटिव्ही मध्ये चित्रित झाले आहे. या घटनेतील चाेरट्यांना शाेधून त्यांचा पाेलिसांनी कायमचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह पशूधारकांकडून केली जात आहे.

जामनेर शहरातील शास्त्रीनगर भागातून २४ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी वासरासह पाच गायींची चोरी केली. विशेष म्हणजे या चोरट्यांनी चक्क एका कारमध्ये गुरांना कोंबून नेल्याचे सीसीटिव्ही फुटेजमुळे उघड झाले आहे. यामुळे पशूधन बाळगणाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. या प्रकरणी शास्त्री नगरमधील भूपेश भरत गायकवाड, शिवाजी समाधान भोलाणे, विकास काशीनाथ महाजन, अक्षय वाघ या चौघांची एकूण ५ गुरे चोरी झाल्याची तक्रार जामनेर पोलिसांत देण्यात आली आहे. चोरी झालेल्या गुरांची जवळपास ४० हजारावर किंमत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, थंडीचा कडाका वाढल्याने नागरिक लवकरच घर लावून घरातच राहणे पसंत करतात. त्याचा लाभ उठवत चोरट्यांनी चाेरी केल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले. पोलिसांनी मध्यरात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

- बापरे! सासू अन् पतीने अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून मारले; पत्नीच्या हत्येचाही प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
- यावल तालुका हादरला ! आईने मुलासह घेतली विहिरीत उडी
- लग्नानंतर अवघ्या ६ व्या दिवशी नवविवाहितेचा अपघातात जागीच मृत्यू; जळगावातील दुर्दैवी घटना
- भरघोस नफ्याचे आमिष पडले महागात ; जळगावातील व्यावसायिकाची ९.३५ लाखांत फसवणूक
- मैत्रीला काळिमा! मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध, रावेरमधील ‘त्या’ हत्येचा पोलिसांकडून उलगडा, दोघे गजाआड







