जळगाव जिल्हाजळगाव शहर

इच्छादेवी चौकातील बेकायदेशीर बांधकामाची आयुक्तांकडे तक्रार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून इच्छादेवी चौकात ६० मीटर महामार्गावर बेकायदेशीर विनापरवानगी बांधकाम सुरू आहे. ते त्वरित काढण्यात येऊन सर्व्हिस रस्त्यासाठी जागा सोडण्यात यावी, अशी मागणी आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रारीद्वारे केली आहे.

तक्रारीत म्हटले की, जळगाव डेव्हलपमेंट प्लॅननुसार इच्छादेवी चौकामध्ये राष्ट्रीय महामार्गाची रुंदी ६० मीटर इतकी दाखवलेली आहे. ६० मीटर रुंदीचा रस्ता दोन्ही बाजूला १२ मीटरचा सर्व्हिस रोड सोडून फोर लेनचा मुख्य मार्ग डिव्हायडर सकट डेव्हलप करायची जबाबदारी नहीची असते. ही जबाबदारी दुर्लक्षित करून नही महामार्ग संपूर्ण विकसित करण्याची जबाबदारी टाळून अंग काढून घेत त्याच्या विकासाची जबाबदारी मनपावर टाकून मोकळी होत आहे. त्यांच्या ह्या बेजबाबदार वर्तनाकडे साधा आक्षेपही न नोंदवता मनपा नहीच्या सर्व चुकीच्या वर्तनाकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करत आहे. इच्छादेवी चौकात सध्या ६० मीटर रुंदीच्या रस्त्यावर एक बांधकाम चालू आहे. हे बांधकाम करताना मनपाने कायदेशीर परवानगी दिली आहे. अथवा नाही हे जाणून घेण्यासाठी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली असता सदर इमारतीस जळगाव मनपाकडून कोणतीही परवानगी दिली गेली नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे हे बांधकाम पाडून सर्व्हिस रोडसाठी जागा मोकळी करून द्यावी, असे म्हटले आहे.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button