जिल्हा कारागृहात पुन्हा ११ कैदी बाधित

फेब्रुवारी 18, 2022 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून नव्या बाधितांची संख्या ४०० च्यावर आढळून येत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी जळगाव जिल्हा कारागृहात काही कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा ११ कैद्यांना गुरुवारी करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. या सर्व बाधित रुग्णांना उपचारासाठी मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे कारागृहात करोनाबाधित झालेल्या एकूण कैद्यांची संख्या आता २४ झाली आहे.

jalgaon district jail

जळगाव जिल्हा कारागृहात १२ जानेवारी रोजी १३ कैद्यांना करोनाची लागण झाली होती. अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सर्वांना मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर गुरुवारी पुन्हा ११ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे.

दरम्यान, करोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये बुधवारीच अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दररोज चारशे पार जात असतानाच रिकव्हरी रेट वाढत असल्याने दिलासा मिळाला आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात ४५१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर दुसरीकडे २८५ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले. बाधितांत १५९ रुग्ण हे जळगाव शहरातील आहेत.

गुरुवारी दिवसभरातील रुग्णसंख्या
जळगाव शहरात १५९, ग्रामीण ३६, भुसावळ ५२, अमळनेर १२, चोपडा २१, पाचोरा ३, भडगाव १२, धरणगाव २०, यावल १२, एरंडोल २, जामनेर ३७, रावेर ७, पारोळा १८, चाळीसगाव ३२, बोदवड ३४ तर इतर जिल्ह्यातील ४ रुग्ण बाधित आढळून आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now