⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 19, 2024
Home | महाराष्ट्र | Breaking ! ‘या’ तारखेपासून शाळा पुन्हा सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती

Breaking ! ‘या’ तारखेपासून शाळा पुन्हा सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जानेवारी २०२२ | मागील काही दिवसापासून कोरोनाची संख्या वाढत असताना राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होती. परंतु आता शाळा सुरु कारण्यांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्यातील शाळा आता पुन्हा सुरू होणार आहेत. येत्या सोमवार पासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील.

शाळा सुरू करत असताना संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन आणि काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात याव्यात. ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास संमती देतील असे विद्यार्थी शाळेत येतील. शिक्षण कुणाचंही थांबू नये अशी आमचा प्रयत्न आहे असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारयांनी दोन डोस घेतलेले असावेत. तसेच शाळेत जाऊन लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत. स्थानिक प्रशासनाला आम्ही शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. काळजी घेऊनच शाळा सुरू कराव्या अशी मी विनंती करत आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

राज्यातील शाळा सुरू करण्याची मागणी अनेक पालक, शिक्षकांकडून होत होती. त्यानंतर या संदर्भात राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली आहे.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.